विश्व श्रीरामसेनेतर्फ़े छटपूजेनिमित्त गंगाआरतीचे आयोजन

 


पिंपरी : विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर रविवारी (दि.१९) सायंकाळी 'भव्य काशी गंगा आरती'चे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी काशी येथून आलेल्या पुरोहितांनी भक्तीपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची विधिवत आरती केली.
यावेळी पालघर हिंदूशक्ती पीठ येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे, आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अर्जुन गुप्ता, भारतीय खाद्य महामंडळ महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य व विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे, हभप शेष महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्राम कुलकर्णी, अनिल उपाध्ये, चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, उमेश सिंग आदींसह हजारो उत्तर भारतीय भाविक उपस्थित होते.

राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य  देऊन होणार आहे.  सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी माहिती लालबाबु गुप्ता यांनी दिली.

यावेळी संजय सम्राट म्युझिकल ग्रुप यांनी धार्मिक  गीते सादर केली. संयोजनात श्याम गुप्ता, उमेश सिंग, मुन्ना सिंह, राजकुमार गुप्ता, विनोद गुप्ता, माधव गुप्ता, पप्पू गुप्ता, राजकुमार प्रसाद, संजय विश्वकर्मा आदींनी भाग घेतला.
विश्व श्रीरामसेनेतर्फ़े छटपूजेनिमित्त गंगाआरतीचे आयोजन विश्व श्रीरामसेनेतर्फ़े छटपूजेनिमित्त गंगाआरतीचे आयोजन Reviewed by ANN news network on ११/२०/२०२३ १२:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".