संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन

 


संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन 

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.२६) भारतीय संविधान दिननिमित्त पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष 

मयूर जाधव यांच्या वतीने पानसरे यांच्या हस्ते संविधान पुस्तिकेचे आणि कामठे यांच्या हस्ते प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले.

  यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर, जेष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, ज्योती निंबाळकर, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, भारत कुंभार, राजेंद्र कडू, सुहास देशमुख, के. डी. वाघमारे, बिरुदेव मोटे, कमलेश वाळके, रेखा मोरे, अनिल भोसले, सुगंधा जाधव, सुवर्णा वाळके, संगीता जाधव, सुदाम शिंदे, विनोद वाघमारे, विशाल क्षीरसागर, सुभाष गालफाडे आदी उपस्थित होते.

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन Reviewed by ANN news network on ११/२६/२०२३ ०५:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".