रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारण राज्यस्तरीय रंगीत तालीम (VIDEO)

 

आंबोळगड, गणपतीपुळे, वेलदूर, कर्दे व वाल्मिकीनगर गावांचा समावेश

रत्नागिरी  : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोळगड, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, गुहागरमधील वेलदूर, दापोली मधील कर्दे आणि मंडणगड मधील वाल्मिकीनगर या ५ गावांमध्ये व जेएसडबल्यु जयगड, आरजीपीपीएल, कोकण एलएनजी, गुहागर या २ कंपन्यामध्ये, तसेच आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स, अल्ट्राटेक या बंदरावर आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनी आपली सज्जता यावेळी दाखविली.

            चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय स्तरावर दोन वेळा बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. रंगीत तालीमच्या अनुषंगाने 7 तारखेला नियोजन करण्यात आले होते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर झाले होते. गावांमधून इशारा देवून सतर्क करणे, आवश्यक साधनसामुग्रीच्या सहाय्याने जखमिंना वाचविणे, जखमिंना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, समुद्रात असणाऱ्या व्यक्तींना लाईफ बोट, लाईफ जॅकेट, दोरी आदीच्या सहाय्याने वाचवून किनाऱ्यावर आणणे आदी प्रात्याक्षिके विविध विभागांनी आजच्या रंगीत तालीमेत सादर केली.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, मुक्ता भोसले पोलीस उपनिरीक्षक, वेदभूषण करगुटकर व विक्रांत तेंडुलकर उपअभियंता बंदर विभाग, सीमा डोंगरे माहिती तंत्रज्ञ, प्रसाद माईन व रमेश तडवी महसूल सहायक आदींनी जिल्हास्तरावरुन या रंगीत तालीमेचे नियंत्रण केले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारण राज्यस्तरीय रंगीत तालीम (VIDEO) रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळ आपत्ती निवारण राज्यस्तरीय रंगीत तालीम (VIDEO) Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०४:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".