आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पिंपरी : तब्बल ६०० बैलगाडे आणि सुमारे ७० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत चाकणमधील घाटावर भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली.. कात्रज, पुणे येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हरण्या जोडीने मानाचा ‘महान भारतकेसरी’ किताब पटकावला आणि थार गाडी मिळवली.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नाईकवाडी यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात प्रथमच छकडी शर्यत (बैलगाडा) स्पर्धा आयोजित करण्यात आली. चाकण येथील शर्यत पार पडली.
या स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधून गाडामालक सहभागी झाले. थार गाडी, टेम्पो, ट्रॅक्टर, ७० दुचाकी अशा भव्य बक्षीसांची उधळण यानिमित्ताने करण्यात आली. एकूण ६०० छकडी आणि सुमारे ७० हजार बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा प्रत्यक्ष घाटात आनंद घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठी ही स्पर्धा ठरली आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : निसर्ग गार्डन, कात्रज, पुणे (संदर आणि हरण्या), २- महालक्ष्मी प्र. विटा (बब्या आणि बावऱ्या), ३- भैरवनाथ प्र. बापुरसाहेब भाडळे वाघोली, उमेश शेठ फुरसुंगी (सरपंच आणि २२११ पिस्टन), ४- स्वामी साई सचिन घरत मोहीलशेठ धुमाळ, सुसगाव (बकासूर आणि सर्जा), ५- जोतिर्लिंग जितेंद्रशेठ देशमुख (लेंगरे) (चिक्या आणि वादळ), ६- स्वराज घिगे नाच्या ग्रुप मोशी (बलमा आणि लक्ष्मणराव), ७-श्रावणी दत्ता शिंदे (पाटखळ) (शिवराज आणि राजा), ८- आईगावदेवी प्र. रणवीर राहुलभाई पाटील (आ. कल्याण) (सिकंदर आणि वायर), ९-चेंडू ग्रुप मंगळापूर नेवसा अमोलशेठ ढगे (हारण्या आणि चिमण्या), १०- पै. सचिनशेठ चव्हाण, वाई (८१८१)(सिकंदर आणि वायर).
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२३ ०७:५२:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: