ज़
थेरगाव : नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रम व स्ंदन बाल आश्रम थेरगाव येथील १८ वर्षाखालील १५० मुलामुलींना दिवाळीनिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार काळेवाडी येथील जैनम सिलेक्शन मधून कपडे, खाऊ, व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आल्या. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर पाडाळे, श्री ओम साई मतिमंद मुलांची आश्रम भूगाव, स्पंदन बालआश्रम थेरगाव अध्यक्ष मनोज मस्के, उद्योजक उमेश काटे, साद सामाजिक संस्था, विकास पवार, निसार भाई शेख, महेश जाधव, विकास मुंगवडे, कमांडो मनोज साळवी, छाया देसले व इतर मान्यवर आणि संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२३ ०७:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: