22 नोव्हेंबर 2023 रोजी गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ खुला होणार

 



 

·   गंधार ऑइल रिफायनरी (इंडियालिमिटेडच्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 160 ते 169 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

·         अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफर कालावधी - मंगळवार21 नोव्हेंबर 2023

· बोली/ऑफर सुरु होण्याची तारीख - बुधवार22 नोव्हेंबर 2023 आणि बोली/ऑफर बंद होण्याची तारीख - शुक्रवार24 नोव्हेंबर2023

·   कमीत कमी 14,872 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त इक्विटी समभागांसाठी 88 च्या पटीत बोली लावता येईल.

·  फ्लोर प्राईस इक्विटी समभागांच्या दर्शनी मूल्याच्या 80.00 पट आणि कॅप प्राईस 84.50 पट निश्चित करण्यात आली आहे.

 

मुंबई गंधार ऑइल रिफायनरी (इंडियालिमिटेडचा (कंपनीआयपीओ बुधवार22 नोव्हेंबर 2023 रोजी खुला होणार आहे.  बोली/ऑफर शुक्रवार24 नोव्हेंबर2023 रोजी बंद होईलअँकर गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफर मंगळवार21 नोव्हेंबर 2023 रोजी खुली होईल.

 

गंधार ऑइल रिफायनरी (इंडियालिमिटेडच्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 160 ते 169 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहेकमीत कमी 14,872 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त इक्विटी समभागांसाठी 88 च्या पटीत बोली लावता येईल.

 

या आयपीओमध्ये एकूण 3,020 मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या (फ्रेश इश्यूइक्विटी समभागांचा तसेच समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांकडून 11,756,910 पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश असेल.  समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांमध्ये श्रीरमेश बाबुलाल पारेख (समभाग विक्री करत असलेले प्रमोटर2,250,000 पर्यंत इक्विटी समभागश्री कैलाश पारेख यांच्याकडून 2,250,000 पर्यंत इक्विटी समभागश्रीमती गुलाब पारेख यांच्याकडून 2,250,000 पर्यंत इक्विटी समभाग (श्रीकैलाश पारेख आणि श्रीमती गुलाब पारेख हे एकत्रितपणे 'समभाग विक्री करत असलेला प्रमोटर ग्रुपम्हणून संबोधण्यात आले आहेतग्रीन डेझर्ट रिअल इस्टेट ब्रोकर्स यांच्याकडून 3,000,000 पर्यंतडेनवर बिल्डिंग मॅट अँड डेकोर टीआर एलएलसी यांच्याकडून 1,000,000 पर्यंतफ्लीट लाईन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसी यांच्याकडून 1,000,000 पर्यंतश्री सुनीत मेनन यांच्याकडून 1,970  पर्यंतश्री विजेंद्र सुमतीलाल पटनी यांच्याकडून 1,970  पर्यंतश्रीविनय प्रभाकर उलपे यांच्याकडून 1,970  पर्यंत आणि श्रीमयूर भूपेंद्रलाल देसाई यांच्याकडून 1,000 पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. (ग्रीन डेझर्ट रिअल इस्टेट ब्रोकर्सडेनवर बिल्डिंग मॅट अँड डेकोर टीआर एलएलसीफ्लीट लाईन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसीश्री सुनीत मेननश्रीविजेंद्र सुमतीलाल पटनीश्री विनय प्रभाकर उलपे आणि श्री मयूर भूपेंद्रलाल देसाई या सर्वांना एकत्रितपणे 'समभाग विक्री करत असलेले इतर समभागधारकअसे संबोधण्यात आले आहे) (समभाग विक्री करत असलेले प्रमोटरप्रमोटर ग्रुप आणि इतर समभागधारक यांना एकत्रितपणे समभाग विक्री करत असलेले समभागधारक असे संबोधण्यात आले आहे आणि त्यांनी विक्रीसाठी प्रस्तुत केलेल्या समभागांना ऑफर्ड शेयर्स असे संबोधण्यात आले आहे.)

 

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा वापर पुढीलप्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे - (1टेक्सोलने बँक ऑफ बरोडाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्व परतफेडीसाठी कर्जाच्या माध्यमातून टेक्सोलमध्ये गुंतवणूक (2कंपनीच्या सिल्वासा प्लांटमध्ये ऑटोमोटिव्ह ऑइलच्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी आणि सिव्हिल कामामार्फत भांडवली खर्च (3कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी (4सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी.

 

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रणअधिनियम1957 च्या नियम 19 (2) (बीअनुसार,  संशोधित ("एससीआरआर"), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल  प्रकटीकरण आवश्यकता जारी करणेनियम 31 नुसार ("सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स") सेबी आयसीडीआर नियम 6(1ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना ("क्यूआयबी") ("क्यूआयबी पोर्शन") प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतीलअँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईलयासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहेअंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप  झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.

 

नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्तप्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेलयासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.

 

पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्यांपैकी उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्तप्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातीलयामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश असेलपण त्यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त बोली येणे आवश्यक आहेनेट ऑफरचा कमीत कमी 15भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसारप्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1,००,००० रुपयांपर्यंत  ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईलयासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब  करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईलयासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहीलयासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहेसर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्तअप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट ("एएसबीए") प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडीमाहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून ("एससीएसबी") किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणेयुपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातीलअँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड ("बीएसई") आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ("एनएसईबीएसई  एनएसई यांना एकत्रितपणे स्टॉक एक्सचेंजेस असे संबोधण्यात आले आहे)  

 

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (आधीची एडेलवीज सिक्युरिटीज लिमिटेडआणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

22 नोव्हेंबर 2023 रोजी गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ खुला होणार  22 नोव्हेंबर 2023 रोजी गंधार ऑइल रिफायनरी (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ खुला होणार Reviewed by ANN news network on ११/१७/२०२३ ०८:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".