गोरेगाव येथे इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू; ५१ जखमी (VIDEO)

 


मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे आज पहाटे तीनच्या सुमारास आझाद मैदानाजवळ असलेल्या जय भवानी भवन या इमारतीस आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन स्त्रियांचा समावेश असून सुमारे ५१ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. सुमारे ३० ते ४० वाहने या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.





गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई - गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 


सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, या दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.'

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
गोरेगाव येथे इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू; ५१ जखमी (VIDEO) गोरेगाव येथे इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू; ५१ जखमी (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/०६/२०२३ ११:५०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".