पिंपरी पालिकेचे २१ कर्मचारी सेवानिवृत्त

 


पिंपरी :   सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी प्रशासन, वैद्यकीय, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य यासारख्या विविध विभागात २५ ते ३० वर्षे प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच आपले शहर उत्तमरित्या विकसित आणि आदर्श शहर निर्माण होण्यास मदत झाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.    

        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या २१ कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सह शहर अभियंता रामदास तांबे, मनोज सेठीया, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी, नथा मातेरे, शिवाजी येळवंडे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

 

माहे सप्टेंबर २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, असिस्टंट मेट्रन स्नेहल करमरकर, कार्यालय अधिक्षक नंदकुमार यनपुरे, उपलेखापाल शालन टिळेकर, राजेंद्र चौगुले, मुख्य लिपिक संभाजी पार्टे, आरोग्य निरीक्षक संदिप कोतवडेवर, सुरक्षा निरीक्षक अनिल तिकोणे, उपशिक्षक वंदना जांभळे, संगिता पवार, वायरलेस ऑपरेटर बबन पानमंद, वाहनचालक दिगंबर टिके, रखवालदार मच्छिंद्र बालवडकर, मुकादम भगवान वाजे, मुकुंद कदम, शिपाई मोरेश्वर भदे, मजूर प्रदिप ढोरे, दस्तगिर तांबोळी, दिलीप अजनकट्टी, सफाई सेवक मिराबाई बोथ, अशोक जाधव यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

पिंपरी पालिकेचे २१ कर्मचारी सेवानिवृत्त पिंपरी पालिकेचे २१ कर्मचारी सेवानिवृत्त Reviewed by ANN news network on १०/०४/२०२३ ०८:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".