पुणे : पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली; यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे होते.
राष्ट्रवादीमध्ये फ़ूट पडल्यानंतर पानसरे कोणाबरोबर याची शहरात चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळला आहे. मूळचे राष्ट्रवादीचे असणारे पानसरे महापालिका आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये गेले होते. मात्र, तेथे नीट बस्तान न बसल्याने त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वगृही परतणे पसंत केले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी दुभंगली. पिंपरी चिंचवडमधील बहुसंख्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर गेले. तर काहींची अवस्था ’मै इधर जाऊं या उधर जाऊं’ अशी झाल्याने त्यांनी सध्या राजकीय विजनवास पत्करला आहे. या पार्श्वभूमिवर पानसरे कोणाबरोबर हा प्रश्न अनुत्तरित होता. त्याचे उत्तर आज जनतेला मिळाले आहे.
पानसरे यांना मानणारा वर्ग शहरात आहे. अजित पवार यांच्याशी त्यांचे फ़ारसे सख्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या रुपाने शरद पवार गटाला वजनदार नेता मिळाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये पानसरे शहरात अजित पवार गटासमोर कितपत आव्हान उभे करू शकतात त्यावर ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२३ ०१:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: