अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि इंडोनेशियामधील सुपरक्रॉस स्टार्स आणि आंतरराष्ट्रीय प्रतिभांनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. ● इंडियन नॅशनल चॅम्पियन रुग्वेद बारगुजे, २एक्स इंडोनेशिया चॅम्पियन आनंदा रिगी आदित्य आणि २एक्स थायलंड चॅम्पियन बेन प्रासित हालग्रेन यांनी २५०सीसी इंडिया-एशिया मिक्स रायडरच्या लिलावासाठी केली नोंदणी
पुणे: सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जागतिक पातळीवर ८५ सुपरक्रॉस स्टार्स आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असल्याची घोषणा आयएसआरएलने केली. या लीगसाठी फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया भागीदार आहे. या जागतिक स्टार्समुळे पहिले सत्र मोटर स्पोर्ट्स चाहत्यांसाठी रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरणार आहे.
भारतात जागतिक दर्जाची सर्धा घेण्याचे उद्दिष्ट सीएट आयएसआरएलचे होते. या जागतिक स्पर्धकांच्या सहभागाने ते पूर्णत्वास येत आहे. या स्पर्धेला जगभरातील रायडर्स भरघोस प्रतिसाद देत आहेत. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, थायलंड, इंडोनेशिया, जर्मनी, स्वीडन, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा विविध देशातील हे ८५ रायडर्स आहेत. या विविध प्रकारच्या निपुण रायडर्समुळे संघ मालकाला आपल्या स्वप्नातील संघ तयार करण्याची संधी मिळणार आहे. जगभरातील रायडर्स सहभागी होत असल्याने संघ मालकांना निवड करण्याची मोठी संधी आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील नैपुण्य यांचा मिलाप संघ मालकांना करता येणार आहे. निवडीतील या स्वातंत्र्यामुळे या लीगला वेगळा आयाम मिळणार असून त्यातून रोमांचकारी रेसिंग अनुभवही चाहत्यांना घेता येणार आहे. शिवाय संपूर्ण सत्रात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. आयएसआरएलसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असून लिलावातही त्याचा प्रत्यय येणार आहे.
जागतिक पातळीवरील रायडर्सच्या प्रतिसादाबद्दल सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संचालक आणि सहसंस्थापक श्री ईशान लोखंडे म्हणाले की, सीएट आयएसआरएलमध्ये ८५ जागतिक स्टार्स सहभागी होत असल्याचा अत्यंत आनंद असून जागतिक पातळीवर या लीगला उत्तम प्रतिसाद असल्याचा अभिमान आहे. भारतात सुपरक्रॉस रेसिंगचा दर्जा वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट कायम आहे आणि त्याला जागतिक पातळीवर घेऊन जायचे आहे. या लीगमधून भारतीय रायडर्सचे धैर्य दिसून येईल आणि ते जगभरात चर्चेचे ठरले.
या सीएट आयएसआरएलच्या पहिल्या सत्रात ६४ रायडर्सची रायडर पूलमधून निवड केली जाईल. त्यात २० तरुण भारतीय रायडर्सही असतील. ते आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करतील. अनुभवी आणि तरूण असा मिलाप असलेल्या या रेसिंगमध्ये अभूतपूर्व असा रेसिंगचा थरार पाहायला मिळणार आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये होणारी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आता जवळ येऊ घातली आहे आणि पाच संघ तयार असल्याचे घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. येत्या काळात यात आणखी टीमची भर पडणार आहे. रायडर्सच्या लिलावातून रायडर्सची निवड करण्यासाठी या टीम सज्ज झाल्या आहेत.
उद्घाटनाच्या सत्रात भारतातील तीन शहरामध्ये विविध थरारक फेऱ्या पाहायला मिळणार आहेत. यात चार रेसिंग गट असतील. ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, केवळ २५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, २५० सीसी इंडिया एशिया मिक्स आणि ८५सीसी ज्युनिअर क्लास असे हे चार गट असतील. या लीगमध्ये थरारक आणि रोमांचकारी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
रायडर नोंदणी, प्लेअर ऑक्शन आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राचे नियोजन ही सर्व माहिती मिळवण्यासाठी कृपया एसएक्सआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या -
Reviewed by ANN news network
on
१०/११/२०२३ ०४:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: