पिंपरी चिंचवडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक

 


पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरून काल बीडमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर काल रात्री पिंपरी चिंचवडमध्येही आंदोलकांनी आळंदी दिघी रस्त्यावर टायर पेटवून टाकत आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. 

आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती काबूत आणली. या प्रकारानंतर शहरात पोलीस विशेष सावधगिरी बाळगत आहेत.


पिंपरी चिंचवडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक पिंपरी चिंचवडमध्येही मराठा आंदोलक आक्रमक Reviewed by ANN news network on १०/३१/२०२३ १०:२६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".