गणेश मिंड
भिगवण : भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने भिगवण येथील कला महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण व परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीरास प्रतिसाद दिला.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाच्या नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वणवे, भिगवणचे माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, तुषार खराडे, अभिजीत देवकाते, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक संजय जगताप, संपत बंडगर, तेजस देवकाते, अभिमन्यु खटके, प्रशांत वाघ, सुनिल वाघ, सुनिल काळे, सतीश काळे, कर्मयोगीचे संचालक विश्वासराव देवकाते, सुर्यकांत सवाणे, भिगवणचे ग्रा पं सदस्य कपील भाकरे, गुराप्पा पवार, डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
यावेळी बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, युवकांना रोजगार व नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमातुन विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सेवा पंधरवाड्या निमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले तर आभार डॉ. राजाराम गावडे यांनी केले. रक्तदान शिबीरासाठी पुणे यथील अक्षय ब्लड बँक तसेच कला महाविदयालय, भिगवण येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भिगवण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२३ ०८:२२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२३ ०८:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: