पुणे : सनातन संस्था धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण यासाठी कार्यरत असून ठिकठिकाणी विविध उपक्रमांच्या आयोजनातून जनजागृती करण्याचे कार्य करते. या अंतर्गत पितृपक्ष म्हणजेच 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत पुणे जिल्हात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मात ईश्वरप्राप्तीसाठी ‘देवऋण’, ‘ऋषिऋण’, ‘पितृऋण’ आणि ‘समाजऋण’ असे चार प्रकारचे ऋण फेडण्यास सांगितले आहे. यातील ‘पितृऋण’ फेडण्यासाठी पितरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. या विषयी सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यात ठीकठिकाणी पितृपक्षानिमित्त प्रवचन, दत्ताचा सामूहिक नामजप घेण्यात आला. तसेच फलक प्रसिद्धीही करण्यात आली. प्रवचनात सहभागी झालेल्या पैकी बहुतेक जणांनी विषय आवडल्याचे सांगितले. बहुतांश सर्वच ठिकाणी अश्या प्रकारचे उपक्रम नेहमीच घायला हवेत असे उपस्थितांनी सांगितले.
श्रद्धा गार्डन येथील श्री विघ्नहर्ता गणपती मंदिर येथे 2 ऑक्टोबर या दिवशी पितृपक्षा निमित्त प्रवचन झाले. यावेळी 250 जणांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. पुणे जिल्ह्यात तसेच पिंपरी चिंचवड मध्ये प्रवचनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रवचन झाल्यावर सामूहिक पणे दत्ताचा नामजप करण्यात आला. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धर्मशास्त्रानुसार श्राद्ध का आणि कसे करावे यासाठी सनातन संस्थेच्या वतीनेपुणे जिल्ह्यात विविध उपक्रम
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२३ ०९:४६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२३ ०९:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: