पुणे : दहशतवादी संघटना इसिसशी संबंधित पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून या प्रकरणात तीन महिलांचाही सहभाग असल्याची धक्कादायक कबुली तपासयंत्रणांना मिळाली असल्याचे वृत्त आहे, मात्र, तपासयंत्रणांनी काही पावले उचलण्यापूर्वीच या तिघीही पसार झाल्या आहेत.
पुणे इसिस मोड्यूल प्रकरणात मो. शाहनवाज आलम, मोहम्मद रिजवान अशरफ उर्फ मौलाना आणि मोहम्मद अरशद वारसी यांना अटक करण्यात आली आहे. शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याने मो. रिजवान याची पत्नी अलफिया, मो. शाहनवाज याची पत्नी मरियम आणि बहिणीचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या पैकी अलफ़िया ही पाकिस्तानातून या दहशतवादी कारवायांची सूत्रे हलविणा-याच्या संपर्कात होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यासर्वांचा देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याचा आणि राजकीय नेते, उद्योगपती आणि फ़िल्मस्टार यांच्या हत्या घडविण्याचा कट होता असेही तपासात उघड झाले आहे.
दरम्यान या तिन्ही महिला पसार झाल्या असून त्यांचा दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, बिहार आणि केरळमध्ये तपासयंत्रणा शोध घेत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२३ ०३:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: