पुणे : पुण्यातील एका माजी नगरसेविकेने मित्राने शारिरीक जवळीक असलेली छायाचित्रे आणि ध्वनीफ़ित सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची मागणी करत बलात्कार केल्याची तक्रार पर्वती पोलीसठाण्यात केली असून या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे त्याचे नाव आहे.
आरोपी सचिन काकडे आणि तक्रारदार माजी नगरसेविका हे मित्र आहेत, या ’मैत्रीपूर्ण’ संबंधातून काढलेली छायाचित्रे आणि त्या सन्मानीय माजी नगरसेविकेचे ’मैत्रीपूर्ण’ संभाषण असलेली ऒडिओक्लिप काकडे यांच्याकडे होती. हे मैत्रीपूर्ण संबंध ’अर्थपूर्ण’ व्हावेत म्हणून त्याने त्या आपल्या मैत्रीण माजी नगरसेविकेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. तिने पैसे न दिल्यास छायाचित्रे आणि ऒडिओक्लिप तिच्या पतिला देण्याची धमकीही दिली.
दोन दिवसांपूर्वी काकडे आपल्या माजी नगरसेविका मैत्रिणीच्या घरी गेला, तू दुसरे लग्न केलेस. तुझ्यामुळे माझी पत्नी मला सोडून गेली असा आरोप करत त्याने आपली मैत्रीण असलेल्या माजी नगरसेविकेला मारहाण केली. हा मैत्रीपूर्ण जाच असह्य झाल्याने अनेक वर्षांपासून मित्र असलेल्या काकडे याच्याविरोधात तिने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी काकडे याला अटक केली असून उपनिरीक्षक सचिन निकाळजे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान पुण्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२३ १२:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: