पिंपरी : अनैतिक संबंधांचा संशय प्रेयसीच्या पतीला आल्यामुळे त्याचा खून करणा-या एकाला हिंजवडी पोलिसांनी मोठ्या शिताफ़ीने तपास करून अटक केली आहे.
अक्षय भास्कर खिल्लारे वय-२१ असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो दसरा चौक, बालेवाडी, पुणे येथे रहात होता, त्याचे मूळ गांव हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव आहे. मृताचे नाव किशोर प्रल्हाद पवार वय - ३५ असे असून तो पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या सूसगाव येथे रहात होता.
त्याची पत्नी रेणुका किशोर पवार वय-३० हीने २५ सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीसठाण्यात आपला पती २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. सहायक फ़ौजदार हरीभाऊ रणपिसे यांना तपास करताना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना तसे सांगितल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे व गुन्हे पथकातील अंमलदार यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. पथक तपास करत असताना मृत किशोर पवार दिनांक २४/ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याचा मित्र अक्षय खिल्लारे याच्या मोटरसायकल वरुन कोठेतरी गेला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर खिल्लारे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
खिल्लारे याने दिलेल्या कबुलीजबाबानुसार त्याचे मृत किशोर पवार याची पत्नी रेणुका पवार हिच्याशी अनैतिक संबंध होते, त्याचा संशय किशोरला आला होता. त्यामुळे खिल्लारे याने त्याचा खून करण्याचे ठरविले. त्या उद्देशाने त्याला दिनांक २४ रोजी “माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे माझेसोबत चल” असे सांगून सायंकाळी साडेपाच वाजता वारक या गावातील मुळशी धरणाच्या पाण्याजवळ नेले तेथे लघवी करण्याचा बहाणा करून किशोर पवार बेसावध असताना त्याच्यावर पाठीमागून विळयाने वार करून त्याला ठार मारले. त्याचा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून मृतदेहाचे हातपाय बांधून तो धरणाच्या पाण्यात फ़ेकून दिला.
खुनाची कबुली आरोपीने देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. आरोपीवर हिंजवडी पोलीसठाण्यात १११८/२०२३ क्रमांकाने भा.दं.वि.कलम ३६४, ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अजितकुमार खटाळ करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२३ ११:४१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: