पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध फ़ारसे सौहार्दपूर्ण नाहीत हे जगाला माहीत आहे. पण, अलिकडे पाकिस्तानातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती त्यादेशातील सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. पाकिस्तानातील तरुणपिढी भारताची प्रगती आणि स्थैर्य याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. आताशा पाकिस्तानातील अनेक यूट्यूबर्स, प्रसारमाध्यमे भारताचे मुक्तकंठाने कौतुक करताना दिसतात. भारताला कट्टर शत्रू मानणारे काही मूलतत्ववादी सोडले तर पाकिस्तानातील नवी पिढी ’हमसाया मुल्क’ असलेल्या भारताशी सलोख्याचे संबंध असावेत असे उघड्पणे म्हणताना दिसत आहे.
तरुण, तरुणींना भारतातील शैक्षणिक संधी, मुक्त वातावरण, सिनेसृष्टी, क्रीडाक्षेत्र यांचे आकर्षण वाटू लागले आहे. अशीच एक विराट कोहलीची पाकिस्तानी चाहती तरुणी भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आली होती. तिची बिनधास्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ती आपण खास विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी आल्याचे सांगत आहे. बाबर आझम आणि विराट कोहली यापैकी तुला कोण अधिक आवडतो? या प्रश्नावरही ती क्षणाचाही विलंब न लावता विराटचे नाव घेताना दिसत आहे. तिने आपल्या चेह-यावर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही राष्ट्रांचे ध्वज रंगवून घेतले होते पाकिस्तानलाही आपला पाठिंबा असल्याचे तिने सांगितले.
तिच्याशेजारी असलेल्या एका व्यक्तीने तिला टोकण्याचा प्रयत्न केला असता तिने ’चाचा पडोसियोंसे प्यार करना बुरी बात तो नही है ना?’ असे विचारून त्याला गप्प केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: