मुंबई : गणेशोत्सव जवळ आला आहे. मुंबईतून मोठ्यासंख्येने चाकरमानी कोकणातील आपल्या मूळगावी निघाले आहेत. मात्र, यंदाही त्यांच्या नशिबी असलेला खडतर प्रवास टळलेला नाही. मुंबई गोवा महामार्गाचे गेले एक तप कूर्मगतीने चाललेले काम याला कारणीभूत आहे. यावर्षी गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सोबत घेऊन चारवेळा या मार्गाचे पाहणी दौरे केले. ठेकेदाराला आणि प्रशासनाला सूचना केल्या. मात्र, परिस्थिती”जैसे थे’ तपश्चर्येशिवाय देव प्रसन्न होत नाही असे म्हणतात. प्रशासन यासाठी गणेशभक्तांकडून ही खडतर तपश्चर्या करून घेत नाही ना?
कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा प्रवास खडतरच! ( VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२३ ०१:५६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: