,उं
मुंबई : इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला 'महासत्ता' हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अवतारनार आहे.
'महासत्ता' या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे आणि निर्मिती रवी अग्रवाल यांनी केले असून अरुण नलावडे, अविनाश नारकर, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, अश्विनी एकबोटे, शैला काणेकर आणि ज्योती सुभाष या नामवंत कलाकारांच्या अभिनयाने या चित्रपटाला वास्तवदर्शी जिवंतपणा आला आहे.
'महासत्ता' हा चित्रपट ७० कामगारांभोवती फिरतो जे त्यांच्या कुटुंबासाठी कर्तेधर्ते असून त्यांच्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आहे. चेंबूरच्या एका मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे कामगार ज्यांनी आपल्या आयुष्याचे १५ ते २० वर्ष कंपनीला दिले त्यांना कंपनीने कुठलीही पूर्व कल्पना न देता थेट कामावरून काढून टाकले, या अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचा आवाज म्हणजे ‘महासत्ता’ चित्रपट.
“८० च्या दशकात गिरणी कामगारांनी कंपन्यांविरुद्ध जो संप पुकारला होता, त्याचे उमटलेले पडसाद ठळक दाखवणारा ‘महासत्ता’ हा वास्तवदर्शी चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या आमच्या मराठी ओटीटीवर आम्ही प्रदर्शित करत आहोत.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२३ ०८:५६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: