'इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स '(इशरे) च्या परिषदेत चर्चा
पुणे : वाढते कार्बनीकरण कमी करण्यासाठी ऊर्जा सक्षम,पर्यावरण पूरक तंत्रज्ञान वापरण्यासाठी सर्व स्तरात जागृती घडवून आणण्याचा निर्धार 'इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग,रेफ्रिजरेटिंग,एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स '(इशरे) च्या परिषदेत करण्यात आला.पुण्यात शनिवार,९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'चिलर कॉन्क्लेव्ह अँड हिट पंप कार्निव्हल-२०२३' या एक दिवसीय परिषदेमध्ये तंत्रज्ञ,तज्ज्ञ आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन चर्चा केली.हॉटेल टिपटॉप (वाकड) येथे झालेल्या या परिषदेला २२५ प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत अभियंते,तंत्रज्ञ,सल्लागार,कंत्राटदार,उद्योजक,शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी यांचा समावेश होता.संयोजक आशुतोष जोशी,सहसंयोजक चेतन ठाकूर यांनी स्वागत केले. के.राघवन,डॉ.आनंद बाबू,डॉ.नितीन देवधर हे पाहुणे उपस्थित होते.'एनर्जी एफिशियंट,कॉस्ट इफेक्टिव्ह चिलर' या चर्चासत्रात जयंत देशपांडे,अयाझ काझी,सागर मुनीश्वर,संदीप आनंद,गजानन खोत,राहूल फणसळकर यांनी मार्गदर्शन केले.सुभाष खनाडे,नंदकिशोर कोतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.२०२३ हे वर्ष कार्बनीकरण कमी करण्यासाठी जागृती,प्रशिक्षण आणि कौशल्य विकसन यासाठी कार्यरत राहण्याचे वर्ष म्हणून 'इशरे'ने जाहीर केले आहे. हिटिंग आणि कुलिंग या दोन्ही साठी लागणारे भविष्यात लागणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी,पर्यायांविषयी या परिषदेत चर्चा झाली.
या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.२०७० पर्यंत 'कार्बन नेट झिरो' हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गक्रमण करण्याचा निर्धार करण्यात आला.'डायकिन' च्या वतीने उपयुक्त तंत्रज्ञान,उपकरणांचे प्रदर्शन या परिषदेत मांडण्यात आले होते.इमारती,रुग्णालये,शाळा,मॉल,महाविद्यालये,विमानतळे,फॅक्टरी अशा ठिकाणी हीटिंग आणि कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
Reviewed by ANN news network
on
९/११/२०२३ ०१:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: