पुणे : माजी खासदार आणि पुण्यातील बडे व्यावसायिक संजय काकडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. काल भाजपचे नेते सुनील देवधर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. असे असताना आज काकडे यांचे मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल झाले आहे.
या पत्रात काकडे यांनी म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून, राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपच असेल.
या पत्रामुळे पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढविणार का? ाअणि ते खरोखरच पुण्यातून निवडणूक लढविणार असले तर त्याचा विरोधकांवर नेमका काय परिणाम होईल? या चर्चांना उत आला आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२३ ०५:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: