पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे तीन बांगलादेशी घुसखोरांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी रात्री अटक केली. तिघेही एकमेकांचे नातेवाईक असून ते येथे बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पावर मजूर म्हणून काम करत होते.
सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) अशी या घुसखोर बांगलादेशींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू असून तेथे बिहार, उत्तरप्रदेशमधील मजूर काम करत आहेत. त्यांच्यासोबत हे तीन घुसखोरही तेथे राहून मजुरी करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे एटीएसने तेथे छापा घालून या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडेही बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड सापडली असून ती त्यांनी कोलकाता येथे बनवून घेतल्याची कबुली त्यांनी एटीएसकडे दिली आहे. हे तिघेही ९ महिन्यांपूर्वी भारतात बेकायदेशीरपणे आले होते. यापैकी दोघे जुलै महिन्यात तर एकजण ऑगस्ट महिन्यात मोशी येथे आला होता.त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
९/१९/२०२३ ०५:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: