पिंपरी : पिंपरी चिचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांचा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
युवक अध्यक्षपदी शेखर काटे तर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नाना काटे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेखर काटे व सहकारी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांना निवडीचे पत्र दिले.
पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या युवकांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. शनिवारी युवक अध्यक्षांसह तीन शहर कार्याध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते. पुणे येथे हा कार्यक्रम झाला. शेखर काटे, प्रसन्न डांगे, प्रसाद कोलते,तुषार ताम्हाणे यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडावी व राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी अशा सूचना देखील नाना काटे यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना केली.
Reviewed by ANN news network
on
९/१०/२०२३ ०५:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: