सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा

 


पुणे : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी गतीने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी   भूलतज्ज्ञ व अन्य पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असेपर्यंत बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे मंत्री वळसे पाटील म्हणाले. कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांच्या संख्येत सुमारे दीडपट वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांची गरज वाढली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांनी सांगितले. औषध पुरवठ्याच्या अनुषंगाने शासनस्तरावरून कार्यवाही सुरू असून औषध पुरवठाबाबत अडचण येऊ दिली जाणार नाही, असे मंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा, वैद्यकीय उपकरणे आदी अनुषंगाने आढावा घेऊन सूचना दिल्या. 

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा Reviewed by ANN news network on ९/१७/२०२३ ०४:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".