अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. मागील १६ दिवसांपासून ते अंतरवाली सराटी गावात उपोषण करत होते, त्यांच्या उपोषण स्थळी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळाने भेट घेतली. जरांगे आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास १० मिनिटे चर्चा झाली. त्यांच्या या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडले आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर आदी आंदोलनस्थळी हजर होते.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले!
Reviewed by ANN news network
on
९/१४/२०२३ ११:११:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१४/२०२३ ११:११:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: