पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील कुख्यात विकी मल टोळीवर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख विकी रामप्रसाद मल (वय ४२, रा. थेरगाव), प्रसाद रोहीदास भापकर (वय २४, रा. रहाटणी), प्रतीक अंतवण पवार (रा. थेरगाव) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे असे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पिंपरी : विकी मल टोळीवर 'मोक्का' खाली कारवाई
Reviewed by ANN news network
on
९/१४/२०२३ ०४:४०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: