मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार हा सामाजिक कार्याला प्रोत्साहन, व सामाजिक उंची देणारा : खासदार श्रीरंग बारणे

 


पिंपरी : मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार हा सामाजिक कार्याला प्रोत्साहन, व सामाजिक उंची देणारा पुरस्कार ठरला आहे. समाजात खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींनी आपला ठसा उमटविला आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार शमीम हुसेन फाउंडेशन वतीने देऊन शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी हा पुरस्कार सार्थक ठरला , असे उद्गार मावळ लोकसभा मदत संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.

शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023पुरस्कार देऊन करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे बोलत होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शमीम हुसेन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात आला

या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे या पहिल्या वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 14 व्यक्तींचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . सदर पुरस्कार सोहळा हा 9 सप्टेंबर रोजी शनिवारी सायंकाळी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला .मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विधान परिषदेच्या सदस्य आमदार उमाताई खापरे, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगर सेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढवितो - आमदार उमाताई खापरे

विधान परिषद सदस्य आमदार उमाताई खापरे यांनी आपल्या भाषणात शबनम न्यूज वृत्तसंस्था ही पत्रकार क्षेत्रात मागील सात वर्षापासून अविरतपणे कार्य करीत आहे त्यांच्या या सातव्या वर्धापन दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला गेला याचे समाधान व्यक्त करीत शबनम सय्यद यांच्या विषयी त्यांनी कौतुकास्पद उद्गार काढले एक महिला या नात्याने अति परिश्रम घेऊन पत्रकारिता क्षेत्रात प्रगती करत आहे . साप्ताहिक वृत्तपत्र , वेबसाईट बरोबरच दैनिक मेट्रोसिटी हे वृत्तपत्र सुरु केले याचा आपल्याला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना त्यांनी शुभेच्छा दिल्या हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढवितो , पुरस्कारार्थी यांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या वतीने समाजात आणखीन चांगले कार्य घडावे अशा शुभेच्छा उमाताई खापरे यांनी दिल्या.

शबनम न्यूज वृत्त संस्थेचा सात वर्षाचा अति परिश्रमाचा प्रवास थक्क करणारा - भाऊसाहेब भोईर

अखिल मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष तथा नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात शबनम न्यूज वृत्त संस्थेचा मागील सात वर्षाचा प्रवास उलगडून सांगितला, शबनम सय्यद यांनी मागील सात वर्षांपूर्वी शबनम न्यूज या साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात केली त्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शबनम सय्यद या प्रत्येक अडचणीवर मात करीत त्यांनी साप्ताहिक वृत्तपत्रासोबतच शबनम न्यूज चैनल, वेब पोर्टल व त्यानंतर दैनिक मेट्रोसिटी वृत्तांत हे वृत्तपत्र सुरू केले त्यांचा हा सात वर्षाचा अति परिश्रमाचा प्रवास थक्क करणारा असल्याचे भोईर यांनी सांगितले आणि आज या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मेट्रोसिटी आयकॉन 2023 या पुरस्काराच्या प्रथम वर्षात समाजात खऱ्या अर्थाने ज्या व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत अशाच सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी समाधान व्यक्त केले व शबनम न्यूज च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

समाजाचा खरा आरसा दाखविणारे वृत्तपत्र शबनम न्यूज -  प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल

समाजाचा खरा आरसा दाखविणारे वृत्तपत्र शबनम न्यूज असून आज शबनम न्यूज आपले सात वर्षे पूर्ण करत आहे या सात वर्षात त्यांनी अनेक क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविल्या त्यांनी या सात वर्षात आपली शबनम न्यूज वृत्तसंस्था संपूर्ण शहरात विकसित केली आपल्या संस्थेबरोबरच समाजात घडत असलेल्या चांगल्या कार्याचे भान ठेवत ,समाजात जे प्रामाणिकपणे कार्य करीत आहे त्यांनाही आज त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित केले त्यांना मेट्रोसिटी आयकॉन 2020 पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले याबद्दल मी शबनम न्यूज चे मनापासून आभार व्यक्त करतो व सातव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचे अभिनंदन करीत त्यांचे वृत्तपत्र सेवेचे कार्य असेच अविरतपणे सुरू राहावे अशी कामना करतो या शब्दात प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी शुभेच्छा दिल्या

संस्थेच्या वतीने मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार सोहळ्याचे हे प्रथम वर्ष आहे . पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप या वृत्तसंस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजातील अनेक घटकांना ज्या समाजसेवकांच्या वतीने लाभ मिळाला आहे तसेच आपल्या शहरात ज्या व्यक्तींच्या कार्याने समाजाची उन्नती होण्यास तसेच समाजाचा विकास होण्यास चालना मिळाली आहे अशा व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात आला

मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्काराने सन्मानित होणारे पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे, माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार, सखी महिलाबचत गट च्या अध्यक्ष तथा माळी महासंघ महिला आघाडी च्या उपाध्यक्ष रुपाली प्रदीप आहेर माजी नगरसेवक राहुल हनुमंतराव भोसले, सरपंच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास गुलाबराव तांबे, वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर मनीषा सुमंत गरुड, काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील महिला अध्यक्ष सायली किरण नढे,अखिल थेरगाव युवा मंचच्या अध्यक्ष करिश्मा सनी बारणे, साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष साधना नेताजी काशीद, अधिरा स्कूलचे संस्थापक नवनाथ ढवळे, नारीशक्ती महिला मंचच्या अध्यक्षा, समाजसेविका तथा उद्योजिका नीलिमा विश्वनाथ उर्फ मनोज जरे, सांगवी परिसरातील शितोळे विद्यालयाचे आदर्श शिक्षक शिवाजी माने, टाटा मोटर्सचे आदर्श कामगार सोमनाथ दगडू कोरे व देवकर दत्तात्रय आनंदा या थोर व्यक्तींचा सन्मान मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार देऊन करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे , भाजप नेते प्रमोद पवार , शिवसेना नेते नेताजी काशीद , राष्ट्रवादी चे अकबर मुल्ला , काशिनाथ नखाते , सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे, काँग्रेस चे किरण नढे,यांच्या सह अनेक महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला.

या वेळी शमीम हुसेन सामाजिक संस्थेचे संचालक रशीद सय्यद , साहूल उर्फ हमीद शेख , रेहान सय्यद फ़रदीन सय्यद , गाजला सय्यद, यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे, नागरिकांचे आभार शमीम हुसेन फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष तथा शबनम न्यूज च्या संपादिका शबनम सय्यद यांनी व्यक्त केले.

मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार हा सामाजिक कार्याला प्रोत्साहन, व सामाजिक उंची देणारा : खासदार श्रीरंग बारणे मेट्रो सिटी आयकॉन 2023 पुरस्कार हा सामाजिक कार्याला प्रोत्साहन, व सामाजिक उंची देणारा :  खासदार श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on ९/११/२०२३ १०:४८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".