मदुराई : तामीळनाडूतील मदुराई रेल्वेस्थानकानजिक आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास लखनौ रामेश्वरम एक्सप्रेसच्या एका डब्यात आग लागली. या आगीत ८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून सर्व मृत उत्तर भारतीय आहेत. २० जण जखमी झाले आहेत. डब्यात एकंदर ५५ प्रवासी होते. या डब्यातून बेकायदा गॅस सिलिंडरची गॅस सिलेंडर वाहून नेले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. आगीचे वृत्त कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले.
इतर डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
रेल्वेला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू; २० जखमी! (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
८/२६/२०२३ ११:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: