पिरामल फाउंडेशन अँड स्टॅँडर्ड चार्टर्ड बॅँकेने ग्रामीण समुदायांतील ५ लाख लाभार्थींना केला सुरक्षित पेयजलाचा पुरवठा
• सात राज्यांतील १२३ गावं आणि २५ शाळांमध्ये जलसुरक्षा आणि शाश्वत जलस्त्रोतांसाठी काम करण्याच्या हेतूने दोन्ही संस्थांनी सुरक्षित पेयजल प्रकल्प हाती घेतले आहेत.• माननीय पंतप्रधानांच्या अमृत काल उद्दीष्ट्याशी मेळ साधत या गावांतील समुदायांनी कार्यक्षम कृषीपद्धती आणि जलसंवर्धन तसेच सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रयत्नांतून जलसुरक्षेच्या दिशेने उचलले मोठे पाऊल
मुंबई : भारत: पिरामल फाउंडेशन आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंकेने यांनी एकत्र येत फाउंडेशनचा जल उपक्रम पिरामल सर्वजल तसेच एनेबल हेल्थ सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील ५ लाख लाभार्थींना सुरक्षित पेयजल पुरविले. ग्राम जल समिती (व्हिलेज वॉटर कमिटी – VWC) च्या सदस्य असलेल्या ५० टक्के महिलांच्या नेतृत्वाखाली राबविला गेलेला हा कार्यक्रम आता एका एकात्मिक जलव्यवस्थापन कार्यक्रमात विकसित झाला आहे, ज्याअंतर्गत सात राज्यांतील १२३ गावे आणि २५ शाळांमध्ये जलसुरक्षेवर तसेच जलस्त्रोतांच्या शाश्वततेवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी या कार्यक्रमाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये जलसंवर्धनाच्या प्रयत्नांचे नियोजन करण्यासाठी व त्यांच्या देखरेखीसाठी ग्रामस्तरावरील संस्था निर्माण करत तसेच पेयजल थांब्यांचे विकेंद्रीकरण करत व जलसुरक्षेच्या दिशेने सामुदायिक कृतीस प्रोत्साहन देत सामुदायिक स्वामीत्त्वाच्या भावनेस प्रेरणा दिली आहे. सध्या VWC च्या ४१७ महिला सदस्य जलव्यवस्थापनाच्या कामाचे तळागाळाच्या स्तरापासून नेतृत्व करत आहेत आणि आपल्या ग्रामसमितीचा भाग बनून जल संवर्धन, कृषी कार्यक्षमता आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन या विषयांशी संबंधित उपाययोजनांच्या व्यवस्थापनात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमांतर्गत ३४ महिला ऑपरेटर्सची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे व या महिला आता स्थानिक पातळीवर बदल घडवून आणण्याचे काम करत आहेत व गावांमध्ये पाण्याचा सुयोग्य प्रकारे वापर करण्यासाठीच्या पद्धतींचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी घेत आहेत.
विशेष म्हणजे या गावांपैकी ४९ टक्के गावे ही महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये स्थित असून त्यांचा मानव विकास सूचकांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स – HDI) कमी आहे. या कार्यक्रमामध्ये जलस्त्रोतांच्या सामुदायिक स्वामीत्वाची उभारणी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी या क्षेत्रांमध्ये VWCs ची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना सक्षम बनविण्यात आले आहे. या भागीदारीतून कृषी-कार्यक्षमता प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून, शेतीच्या अधिक चांगल्या पद्धतींमुळे झालेल्या सक्षमीकरणातून आणि १.९ कोटी रुपये रकमेच्या कृषीसंबंधी सरकारी योजनांचा लाभ मिळण्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा झाला आहे.
या कार्यक्रमामुळे ५ लाख लोकांच्या आयुष्यावर झालेल्या सकारात्मक परिणामाविषयी बोलताना स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅँक, इंडियाच्या सस्टेनेबिलिटी विभागाच्या प्रमुख करुणा भाटिया म्हणाल्या, “बँकेचा प्रमुख सीएसआर कार्यक्रम WASHE (वॉटर सॅनिटेशन हायजीन एज्युकेशन) एनेबल हेल्थ सोसायटी आणि पिरामल वॉटर फाउंडेशन उपक्रमाच्या भागीदारीमधून केवळ सुरक्षित पेयजल पुरविण्यापलीकडे जात एक जलसुरक्षित ग्रामीण समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने काम करताना पाहणे भारावून टाकणारे आहे. स्थानिक समुदाय, विशेषत: महिलांच्या सोबतीने काम करणे, त्यांना जलसंवर्धनाच्या पद्धती अंगिकारण्यास सक्षम बनविणे, शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर कमी करणे आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करणे या गोष्टींतून शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात एक दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्याच्या बँकेच्या कटिबद्धताच ठळकपणे अधोरेखित झाली आहे.”
पिरामल फाउंडेशनच्या क्लायमेट अँड सस्नेनॅबिलिटी प्रोग्रामच्या प्रमुख संगीता मामगेन म्हणाल्या, “जलसुरक्षा साध्य करताना सुरक्षित पेयजल उपाययोजनांचे विकेंद्रीकरण आणि वर्तनातील बदलांची जबाबदारी समुदायांकडून स्वीकारली जात असल्याचे पाहणे आम्हाला विनम्र करणारे आहे. स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक आणि एनेबल हेल्थ सोसायटीबरोबरच्या आमच्या भागीदारीतून सात राज्यांतील ५ लाख लाभार्थींच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारा प्रभाव पडला आहे, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”
पिरामल सर्वजल उपक्रम हा आपल्या विकेंद्रित कार्यक्रमांची विश्वासार्हता आणि उत्तरदायीत्व यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिला आहे. IoT तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ७५१ जलउपाययोजनांवर देखरेख ठेवत, हे कार्यक्रम २.७९ कोटी लीटर्स पाण्याचे संवर्धन व पुनर्भरण करत आहेत व जलसाठा व बोअरवेल पुनर्भरण संरचनांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची हमी देत आहेत.
सुरक्षित पेयजलाचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये जलजन्य आजारांचे प्रमाण ७६ टक्के कमी झाल्याचे एनेबल हेल्थ सोसायटीने हाती घेतलेल्या इम्पॅक्ट स्टडीमधून दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर अठरा महिन्यांच्या काळात सर्वजल वापरणाऱ्यांचा वैद्यकीय खर्च पाणी न वापरणाऱ्यांच्या तुलनेत ६१ टक्क्यांहून कमी असल्याचेही आकडेवारीतून आढळले आहे यातून सुरक्षित पेयजल उपलब्ध होण्याचे आरोग्याला होणारे ठोस फायदे अधोरेखित झाले आहेत.
पिरामल फाउंडेशन अँड स्टॅँडर्ड चार्टर्ड बॅँकेने ग्रामीण समुदायांतील ५ लाख लाभार्थींना केला सुरक्षित पेयजलाचा पुरवठा
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ १०:३१:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ १०:३१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: