विद्यार्थ्यांच्या मनात जाज्वल्य राष्ट्राभिमान वृद्धिंगत व्हावा यासाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने उपक्रमाचे यशस्वी आयोजन !
पिंपरी : क्रांतिकारकांच्या बलिदानाचा, त्यांच्या असीम त्यागाचा आणि तेजस्वी शौर्याचा इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतूने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने या महिन्यात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये देशप्रेम आणि देशाभिमान या गोष्टीं शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे आणि हे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे अशी प्रतिक्रिया अनेक शाळा प्रमुखांनी आणि शिक्षकांनी या प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त केली. आणि महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेचे आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
खालील शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
चिंतामणी रात्र प्रशाला, चिंचवड, मातोश्री माध्यमिक विद्यामंदिर, चिखली, पि. चि.म.न.पा. प्राथमिक शाळा, नेवाळे वस्ती, चिखली आदींसह एकूण ११ शाळांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सर्व शाळातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या उपक्रमासाठी बहुमोल सहकार्य केले.
जय भवानी प्राथमिक विद्यामंदिर, मोहननगर, चिंचवड. लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, थेरगाव, एम. एम. एस. हायस्कूल,श्रीधरनगर,चिंचवड,विद्यार्थी विचार प्रशाला,कुदळे वस्ती, चिखली, युनिक व्हीजन शाळा,वाल्हेकर वाडी,चिंचवड, बाबुराव घोलप माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी, नृसिंह विद्यालय, शितोळे नगर, सांगवी, प्रेरणा विद्यालय, वाल्हेकरवाडी, चिंचवड.
सर्व शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमासाठी बहुमोल सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: