पुणे : भालचंद्र ज्योतिर्विद्यालय(पुणे )आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकादमी(सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने , पुण्यात आयोजित ४१ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात विनामूल्य ज्योतिष सल्ला उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.हस्तसामुद्रिक तज्ज्ञ रोहित वर्मा,डॉ.विलास बाफना,नवीन शहा,वास्तुशास्त्र तज्ज्ञ प्रफुल्ल कुलकर्णी अशा अनेकांनी चंद्रकांत शेवाळे यांच्या नियोजनानुसार विनामूल्य सेवा दिली.
उद्यान प्रसाद सभागृह येथे दि २०,२१ ऑगस्ट रोजी हा उपक्रम पार पडला. या सल्ल्यासाठी विविध पध्दतीच्या ज्योतिर्विदांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा चंद्रकांत शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. बाफना यांनी अनेक मान्यवरांचा हात पाहून टाईम स्केल अनुमान पद्धती, स्पेशल पाम फॉर्मेशन, ऑरा रिडिंग, डाऊझिंग विषयक मार्गदर्शन केले. अफर्मेशन, सबकॉन्शस माईंड, ऑरा रिडिंग, हिलींग, डीप काऊन्सिलिंग उपायांचे विश्लेषण करण्यात आले.यावेळी हस्तसामुद्रिक , अॅस्ट्रॉलॉजी विषयक विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ १०:१२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: