- गायत्री इंग्लिश मीडिअम स्कूलचा लक्षवेधी उपक्रम
- विद्यार्थ्यांद्वारे सैनिकांसाठी रक्षाबंधन सोहळा उत्साहात
पिंपरी : ‘राखी’ म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते आणि त्यामुळे त्यांचे आत्मबल वाढते, अशा भावना स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भोंगाळे यांनी व्यक्त केल्या.
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल मोशी, येथील विद्यार्थ्यांनी 'सैनिकहो तुमच्यासाठी' हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायकराव भोंगाळे, विश्वस्थ सरिता विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमासाठी गायत्री विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थिनी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षिका अस्मिता जाधव, योगिता अमराळे व विलास खरे या ठिकाणी उपस्थित होते. दिघी येथील नाईक सुभेदार भोला मिश्रा व हवालदार आर. पी. खोसे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे कडू-पाटील म्हणाल्या की, डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणारे बहाद्दर सैनिक सणासुदीला आपल्या कुटुंबियांपासून लांब असतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी आणि सैनिकांविषयी असणारा आदर त्यांना व्यक्त करता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२३ ०३:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: