प्रविण जैन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवे मुख्य वित्त व लेखा अधिकारी

 


पिंपरी :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैन यांनी २३ ऑगस्ट रोजी पदभार स्विकारला. याआधी जैन मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होते. या पदावर कार्यरत असताना शासनाकडून त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. 

याआधी प्रविण जैन यांनी ग्राम विकास विभागात असताना प्रधान मंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपसचिव तथा वित्तीय नियंत्रकउल्हासनगर महानगरपालिका येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारीमंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात अप्पर सचिवरायगड येथे जिल्हा कोषागार अधिकारीरायगड जिल्हा परिषद येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदांवर काम केलेले असून त्यांची प्रशासकीय विभागात २५ वर्षे सेवा झाली आहे.

प्रविण जैन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवे मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवे मुख्य वित्त व लेखा अधिकारी Reviewed by ANN news network on ८/२६/२०२३ ०३:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".