पुणे : नवभारत मानवतावादी संस्था व शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ ऑगस्ट २०२३ दरम्यान गरजूंना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व रोपवाटप, अनाथ आश्रमास मदत अशा विविध उपक्रमाचे प्रकाश भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते . संघटनेच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी भूषण डावखर यांच्या मार्गदर्शनाखाली जीएसटी भवन पुणे येथे रमेश जैद, यांना संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेची कॅप कर्मयोध्दे विशेषांक, दिनदर्शिका देऊन माजी सैनिकांना सन्मानित केले गेले.
महादेव पवार, संतोष भांदिर्गे, महेंद्र भिलारे, संतोष जाधव, अमीन मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व होतकरू मुलांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आरोग्य सेवेतील मोलाच्या योगदानाबद्दल बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथे कर्मचार्यांचा सन्मान व पर्यावरण संतुलनासाठी डॉ. आरती किणीकर, उपाधिष्ठाता व डॉ .भामरे वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण व रोप वाटप करण्यात आले. प्रकाश भिलारे यांनी अनाथआश्रमामध्ये अनाथ बालकांसोबत खाऊ, धान्य वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. याबरोबरच सैनिक, शहिदांचे कुटुंबीयांचा सन्मान, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल सत्कार तसेच राष्ट्रभक्तीपर विविध उपक्रम करण्यात आले. गुळुंब हायस्कूल गुळुंब, प्राथमिक शाळा वेलंग, श्री वत्स अनाथाश्रम, ससून सर्वोपचार रुग्णालय व बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे इत्यादी ठिकाणी नियोजन केले.
माजी सैनिक संघटना,नवभारत संस्था यांच्यातर्फ़े संस्था, शाळांमध्ये वृक्षारोपण,रोप वाटप, विविध उपक्रम
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ १०:४४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ १०:४४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: