आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी : आयुक्त शेखर सिंह

 



चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” संस्थेला भेट

पिंपरी : विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण पध्दतींसोबतच पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी, जेणेकरून उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणा-या आणि ती साकार करण्यासाठीचा मार्ग अधिक सुखकर होईल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. आज, दि. २८ रोजी आयुक्त सिंह यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” संस्थेला भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.  

प्रसंगी, आयुक्त सिंग यांनी प्रयोग शाळेची पाहणी केली. अभियांत्रिकी विभागात बांबू पासून तयार केलेल्या वस्तू, नारळाच्या कवटीपासून बनलेल्या कलाकृती, शाडूमातीपासून तयार केलेले गणपती व त्यांच्यापासून पर्यावरणाला होणारे फायदे याबाबत माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. माती परिक्षणातून पिकांसाठी आवश्यक असलेली माती, झाडांच्या वाढीसाठी लागणारे गुणसत्व याबाबत मुलांनी विविध प्रयोगाद्वारे माहिती दिली. चंद्रयान ३ मोहिमेसंदर्भात प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. दरम्यान, स्टीम लर्निंग विभागांतर्गत थींगकींग स्पर्धेत निवड झालेल्या गणेश कामठे, सूजन बनसोडे या विद्यार्थ्यांचे आयुक्त सिंग यांनी कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

समाजाचा मोठा घटक दुर्बल वंचित उपेक्षित राहिला तर समाजाचा गाडा गतिमान होणार नाही. हे समाजचक्र गतिमान होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत विविध समाज विकास योजना, मुलांसाठी मोफत शिक्षण, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महिलांसाठीच्या योजनांचा सूरू करण्यात आलेल्या असून समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे आयुक्त सिंग यांनी यावेळी सांगितले.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम संस्थेबददल माहिती दिली. गुरुकुलम शाळेत ३५० च्या वर मुलं शिकत आहेत. ९ जुन २००६ ला शिवराज्यभिषेक दिनी सुरूवात झाली. पहिली ते १२ वी अशा क्रमाने मुले शिकतात. ही मुले प्रामुख्याने फासे पारधी वडार - कष्टकरी वर्गातील आहेत. ज्याच्या पालकांना शिक्षण काय कोणते द्यावे, हे समजत नाही. मुलही शाळेत न जाता भटकत राहतात. या ठिकाणी त्यांना मराठी भाषे बरोबरच विज्ञानसंगणक तंत्र कौशल्य जसे शेती-भाजीपाला लागवडकंपोस्ट खतरोपवाटिकाबांधकामसायकल व मोटार सायकल दुरुस्तीप्लंबीगरंगकाम इत्यादी बरोबरच मूर्ती कलासंगीतगायनवादनचित्रकलालेखनवाचन संभाषण असे एकूण २० विभागात मार्गदर्शन दिले जाते.

वन औषधीपक्षी निरीक्षणखगोल निरीक्षण यांचा ही भ्यास घेतला जातो. दहा दहाच्या गटांनी हे सर्व विषय शिकवले जातात. या शिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पध्दतिव्दारे शिकवले जाते. मुळच्या कला कौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा -हासआधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून शिक्षण देणे. मुले इथेच राहत असल्यामुळे हे शक्य होते, यासाठी चिंचवड येथे निसर्गरम्य वातावरणात हे गुरुकुल आकार घेतय पंचकोषावर अधारित स्व-तंत्र असा अभ्यासक्रम विकसित करून ही मुले ४ थी ला शिष्यवृत्ती परिक्षेला बसतात. तसेच ७ वी१०वी आणि बारावीच्या परिक्षा देतात. याशिवाय विविध स्पर्धात्मक परिक्षात क्रीडा स्पर्धात भाग घेतात, असे मुख्याध्यापिका पुनम गुजर यांनी सांगितले. 

आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी : आयुक्त शेखर सिंह आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी : आयुक्त शेखर सिंह Reviewed by ANN news network on ८/२८/२०२३ ०३:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".