पुणे : ज्योतिष विश्वात मानाचा समजला जाणारा 'ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार' कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे ज्येष्ठ अभ्यासक व ग्रंथ लेखक आर. के. बन्ने (सांगली)यांना जाहीर झाला आहे.भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकादमी(सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनामध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दि.२०, २१ ऑगस्ट रोजी पुणे येथे हे अधिवेशन होणार आहे.अधिवेशनाचे कार्याध्यक्ष उल्हास पाटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हे अधिवेशन पुणे येथील उद्यानप्रसाद मंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिवेशनात १२ ज्योतिषांचा मोफत सल्ला
अधिवेशनाचे हे ४१ वे वर्ष असून त्यानिमित्त दोन दिवस १२ ज्योतिषांचा मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.चंद्रकांत शेवाळे ( रमल ज्योतिष ), एड .प्रफुल्ल कुलकर्णी ( हस्त सामुद्रिक ), डॉ. जयश्री बेलसरे, ( पारंपारिक ज्योतिष ), कैलास केंजळे ( कृष्णपद्धती ज्योतिष), गौरी केंजळे(मोबाईल न्युमरोलोजी), उमेश कुलकर्णी ( वास्तू ज्योतिष ), अपर्णा गोरेगावकर ( टॅरो ज्योतिष),जानकी पाचारणे( डाऊजिंग ), मुग्धा पत्की (लाल किताब), संजय साळुंखे(पंचांग ज्योतिष ), उषाताई कांबळे( समस्या निवारक उपाय ), रजनी साबदे ( नक्षत्र ज्योतिष) यांचा त्यात समावेश आहे.मात्र यासाठी नियोजित वेळ ठरविण्यासाठी आचार्या सौ.नीता वडके यांच्याशी 9923798686 या क्रमांकावर नावनोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील २७ ज्योतिष संस्थांचाही सहभाग आहे.या २ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण भारतातून सुमारे १ हजार मान्यवर ज्योतिर्विद सहभागी होणार आहेत.
आर. के. बन्ने यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:२७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: