जुन्नरमधील धामणखेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समृद्ध ग्रंथालयाचा शुभारंभ

 



जुन्नर :जुन्नरमधील धामणखेल गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कै. गंगुबाई गेनुभाऊ कोंडे यांच्या स्मरणार्थ ग्रंथालय शुभारंभ धामणखेल गावचे सरपंच संतोष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगुबाई कोंडे यांच्या कन्या राधिका कोंडे - वाळुंज व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला.

मनोरंजनापासून विज्ञान, तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांना स्पर्श करणारी आणि मुलांच्या भावविश्वाला साजेशी 783 नवीकोरी पुस्तके या ग्रंथालयात पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हे ग्रंथालय लाभदायी ठरेल असा विश्वास सरपंच संतोष जाधव यांनी व्यक्त केला. या ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग करून हे शब्दभांडार प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा व त्यांच्यात वाचनाची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. 

यावेळी सरपंच संतोष जाधव यांच्यासमवेत उपसरपंच देवराम कोंडे, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख पंकज वर्पे, मार्तंड खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गबाजी कोंडे व सचिव संजय रघतवान, नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष पांडुरंग वर्पे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अर्जुन वर्पे, यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कोंडे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण वर्पे, शिवाईदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे, माजी सरपंच विलास कोंडे, समाजसेविका सीमा रघतवान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणखेलचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, शिक्षक प्रवीण मोडवे, पांडुरंग डामसे, मनिषा लाडेकर, सतिशकुमार रायलवाड, माध्यमिक शाळा शिक्षक कुटेसर व शिंगोटेसर आणि इतर मान्यवर व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृऋण आणि मातृभूमीऋण यातून उतराई होण्याची संधी आई गंगुबाई गेनुभाऊ कोंडे यांच्या स्मरणार्थ धामणखेल गावच्या जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा आनंद नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी कवी महेंद्र कोंडे यांनी व्यक्त केला. विविध उदाहरणे देत, स्वानुभाव सांगत व्यक्ती विकासातील वाचनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी राधिका कोंडे – वाळुंज, जगदिश गेनुभाऊ कोंडे, महेंद्र गेनुभाऊ कोंडे, सागर पांडुरंग कोंडे तसेच जयेश गजानन कोंडे, राहुल गंगाराम कोंडे, समीर भालेराव आणि कुटुंबीय उपस्थित होते. शाळेचे शिक्षक पांडुरंग डामसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध निवेदन केले.

शिवजन्मभूमी शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या व कुलस्वामी खंडेरायाचे जागृत स्थान असलेल्या धामणखेल गावातील नव्या पिढीत गंगुबाई गेनुभाऊ कोंडे यांच्या स्मरणार्थ सुरू होत असलेले हे ग्रंथालय वाचन संस्कृती रूजविणारे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरेल असा विश्वास शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख पंकज वर्पे यांच्यासह उपस्थित सर्वच मान्यवरांनी व पालकांनी व्यक्त केला. 

जुन्नरमधील धामणखेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समृद्ध ग्रंथालयाचा शुभारंभ जुन्नरमधील धामणखेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समृद्ध ग्रंथालयाचा शुभारंभ   Reviewed by ANN news network on ८/२९/२०२३ ०१:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".