सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात



पिंपरी  : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे ४४ वे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडले. दुपारी तीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व लहान थोर कलाकारांनी आपली उत्तम कला सादर करून लोकांचे मनोरंजन केले. सांस्कृतिक स्पर्धेचे परीक्षण तेजल अहिरराव व सचिन पवार यांनी केले. यामध्ये प्रथम विवाध वयोगटातील विजेत्या कलाकर, डान्सग्रुपला रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच नाट्यसिंधूने चित्रकथी ही एकांकिका सादर केली. एकूण २५० शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

या वर्षीचा मनाचा सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार हा  संजय  पाताडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पाताडे यांनी बोलताना माझ्या कार्याची आपण दखल घेतली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. यावेळी पुरस्काराची रोख रक्कम  मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी देत आहे असे सांगून मंडळाला शुभेच्छा दिल्या. 

यावर्षीचे जीवन गौरव पुरस्कारार्थी  संजय पवार, सुनिल  गायकवाड, चंद्रकांत साळसकर, अनिल   कातळकर, अनिल  मेजारी यांना  सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला ग्लोबल कोकणचे संस्थापक  संजय यादवराव तसेच सिटी प्राईड इंग्लिश स्कूलच्या संस्थापकीय संचालिका  अश्विनी  कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष शंकर  जगताप, काँग्रेस आय पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष कैलास कदम, नगरसेविका सुजाता पालांडे,  कैलास कुटे, सुरेश गवस,  संतोष सुतार, मंडळाचे संस्थापक  प्रमोद राणे  अरविंद पालव, सल्लागार  अंकुश  साईल, परशुराम प्रभू, उपाध्यक्ष अरुण दळवी, कार्याध्यक्ष विश्वास राणे, खजिनदार धर्मराज सावंत, सहखजिनदार चंद्रकांत साळस्कर, उपसेक्रेटरी प्रकाश साईल, व इतर उपस्थित होते.

प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष अरुण दळवी यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये  अजय पाताडे यांनी मंडळाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या  प्रमाणे  वाटचाल चालू आहे. म्हणूनच गेली ४४ वर्ष मंडळ एकसंघ आहे व अशीच वाटचाल पुढे चालू ठेवूया अश्या शुभेच्छा व्यक्त केल्या. 

संजय यादवराव यांनी पुणे जिल्ह्यातील आदर्श मंडळ म्हणून मंडळ कौतुक करत, कोकणासह मुंबई, पुणे येथील कोकणवासीयांच्या विकासाकरिता सरकारचं दुर्लक्ष आहे याकरिता स्वतःच्या न्याय हक्काकरिता आता सर्वसामान्य कोकणी माणसालाच रस्त्यावर उतरून चळवळ उभी करावी लागेल असे आवाहन केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साटम, निवेदन निशिधा बागायतकर तर प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष अरुण दळवी यांनी केले. मानपत्र वाचन  शलाका गवस यांनी केले. तर विश्वास राणे यांनी आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  विष्णू भुते, महादेव बागवे, नंदकिशोर सावंत, दीपक राणे, शरद कौठणकर, यशवंत गावडे, पुंडलिक गावडे, शंकर दळवी, स्वप्निल मलबारी, आनंद साटलकर, प्रकाश परब, सुरेश वेंगुर्लेकर, अमोल चव्हाण, नरेंद्र धुरी, संतोष परब, संजय सावंत, विद्या मेस्त्री, शोभा गायकवाड, राजेश कांडर, प्रशांत सावंत, पराग पालकर, संतोष गावडे, सुनील गायकवाड, बाळा गुरव अनिल सावंत, कृष्णा गवस, संतोष साटम, विशाल घाडी, एकनाथ गवस, अशोक मेजारी, दीपा सावंत, विजय महाडिक, विठ्ठल परब, राजेंद्र गवस, संतोष धुरी, शोभा नाईक, वसंत आरेकर, अधिराज मुळीक, एकनाथ गवस, यांनी मेहनत घेतली.


सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात Reviewed by ANN news network on ८/२९/२०२३ ०५:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".