जळगाव : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पशुधनाचा काळ ठरणा-या लंपी रोगाने डोके वर काढले आहे. जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४३४ गुरांना लंपीची लागण झाली असून आजवर ७९ गुरे या रोगाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडली आहेत.
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी या सातही तालुक्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्हा हा राज्यातील दुग्धोत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे. तेथील लंपीचा संसर्ग वेळीच आटोक्यात आला नाही तर राज्याच्या काही भागात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते.
पुन्हा एकदा राज्यात लंपीचा शिरकाव! ; ७९ गुरांचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
८/२५/२०२३ ०१:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: