यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) तर्फे चिंचवड येथील प्रांगणात प्रमुख अतिथी प्रवीण मसालेवाले कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपव्यवस्थापक लक्ष्मण सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा झाला.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले काम अधिक उत्कृष्ठ व सुयोग्य कसे होईल यादृष्टीने प्रयत्नशील राहिल्यास स्वतःच्या प्रगतीसोबतच आपोआप राष्ट्रविकासात अप्रत्यक्षपणे योगदान दिले जाईल असे सांगितले.
यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह संस्थेच्या एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी,प्राध्यापक व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:१६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: