पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) येथे 'फ्रेशर्स पार्टी -२०२३' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार,दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी अभिजीतदादा कदम सभागृह ,एरंडवणे कॅम्पस येथे हा कार्यक्रम झाला.एमबीए,एमसीए,बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
नृत्य स्पर्धा,गायन स्पर्धा यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आणि टॅलेंट सर्च सर्च राऊंड घेण्यात आला.विजेत्यांचा सत्कार करण्यात आला .आयएमइडी चे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे, पदवीपूर्व विभागाचे संचालक डॉ.महेश शितोळे,आयएमईडीचे उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक उपस्थित होते.
डॉ.प्रवीण माने, डॉ. हेमा मिर्जी,डॉ.सोनाली धर्माधिकारी,डॉ.स्वाती देसाई ,डॉ.अनुराधा येसुगुडे आणि कर्मचाऱ्यांनी आयोजन केले.या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२३ ०३:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: