'केटरिंग मधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार '



न्यू पुणे केटरिंग असोसिएशन चा उपक्रम

पुणे: न्यू पुणे केटरिंग असोसिएशनच्या वतीने केटरर्सना  सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचा गौरव करण्यात आला.बुधवारी  मार्केट यार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता झाला.'केटरिंग सेवेचा दर्जा अद्ययावत करण्यासाठी केटरर्सना सेवा देणाऱ्या व्यावसायिकांच्या  (व्हेंडर्स ) कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षित करुन,नोंदणी व परवाना  यासाठी मदत करू ' असे या मेळाव्यात जाहीर करण्यात आले. 

पुणे केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी, उपाध्यक्ष मनोहर गौर, उपाध्यक्ष दिलीप राजपुरोहित, किशोर सरपोतदार,मनोज वैष्णव, कुणाल परदेशी,कालूमहाराज, गुड्डू मिश्रा,अर्जुन सिंग राजपुरोहित, किशन महाराज,दशरथ राजपुरोहित,गिरधारी गौड,सुखदेव चारण, किशन गौर, डॉ. बिंद्रा , सचिव मनोज वैष्णव,मंसारामजी माळी,कैलाश परमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नकुल संघवी यांनी सूत्र संचालन केले,संजय जाजू (ऑक्सफर्ड रिसॉर्ट) यांच्यासहित अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात  आला.

'केटरर्सना सेवा पुरविणाऱ्या पुरवठादार (व्हेंडर्स) व्यावसायिकांनी असोसिएशनकडे  सदस्य नोंदणी केल्यास असोसिएशन कडून काम दिले जाणार आहे. फुड लायसन्स, इतर आवश्यक परवान्यांसाठी मार्गदर्शन केले जाईल. व्यवसायातील अडचणी विषयी  लेखी सूचना पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले. प्रत्यक्ष वाढपाचे ,स्वयंपाकाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे असून त्यांना अधिक सुविधा देण्याविषयी विचार करावा,असे आवाहन करण्यात आले. 

'चांगले काम करणाऱ्या व्हेंडर्सना उचित मानधन मिळणे आवश्यक असून त्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या जातील', असे माळी यांनी सांगितले. 'सेवा देताना कर्मचारी, स्टाफ यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे . त्याची व्यवस्था केली जाईल,नोंदणीकृत एजेंसी आणि व्हेंडर्सनाच असोसिएशनकडून काम दिले जाईल,त्यासाठी पुढील महिन्याभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येईल',असेही ते म्हणाले.


'केटरिंग मधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार ' 'केटरिंग मधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार ' Reviewed by ANN news network on ८/२५/२०२३ १०:५०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".