'भविष्य वर्तविण्यासाठी अंत: प्रेरणा, साधना वाढवा ': अॅड. सुनिता पागे
पुणे: भालचंद्र ज्योतिर्विद्यालय (पुणे )आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकादमी(सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने , पुण्यात आयोजित ४१ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे शानदार उद्घाटन रविवार, दि २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता झाले.
या दोन संस्थांसह महाराष्ट्रातील २७ ज्योतिष संस्थांचाही सहभाग आहे.या २ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण भारतातून सुमारे १ हजार मान्यवर ज्योतिर्विद सहभागी झाले आहेत.
पुण्यातील उद्यान प्रासाद सभागृह येथे दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत अधिवेशन होत आहे. २० ऑगस्ट रोजी हिंदी अधिवेशनाचे अध्यक्षपद ख्यातनाम टॅरो ग्रंथलेखिका ॲड.सुनीता पागे यांनी भूषविले . अधिवेशनाचे उदघाटन उद्योजक हेमचंद्र दाते आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. स्वागताध्यक्षपदी वास्तु ज्योतिषी ॲड.सौ.वैशाली अत्रे होत्या. चंद्रकांत (दादा ) शेवाळे, पुष्पलता शेवाळे यांनी स्वागत केले.
दुस-या दिवशीच्या मराठी अधिवेशनाचे उदघाटन ग्वाल्हेर येथील विख्यात ज्योतिर्विद डाॅ.रमेश वायगावकर करणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्योतिष ग्रंथ लेखक व.दा.भट असून स्वागताध्यक्ष म्हणून मुंबईच्या गुरुश्री प्रिया मालवणकर असतील.दोन्ही दिवस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.मानाचा समजला जाणारा ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार सांगलीच्या आर.के.बन्ने अण्णा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
उद्धाटन प्रसंगी राजेश वशिष्ठ (चंदीगड),अप्पासाहेब नवले, पं. दिलीप अवस्थी,उल्हास पाटकर, डॉ मधुसूदन घाणेकर, प्रदीप पंडित, कैलास केंजळे उपस्थीत होते.
अॅड. सुनीता पागे म्हणाल्या, 'ज्योतिष पाहण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी अंत:प्रेरणा महत्वाची आहे. ती असेल तर ज्योतिष वर्तविण्याची अचूकता वाढते. अंत प्रेरणा साधनेने निर्माण होते, त्यावर भर द्यावा'.
एम के फडके म्हणाले, 'ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक आहे, त्यामागील शास्त्र समजून घेतले पाहिजे'.
'ज्योतिष शास्त्र हे अभ्यास करण्याने अवगत होते, त्यामूळे ज्योतिषाने ज्ञान वृद्धिंगत करण्यावर भर द्यावे', असे प्रतिपादन डॉ जयश्री बेलसरे यांनी केले .
ग्रहांकित विशेषांकाचे प्रकाशन आणि ज्योतिष विषयक ३० पुस्तकांचे प्रकाशन पहिल्या दिवशी झाले. 'डॉ जयश्री बेलसरे कार्य गौरव पुरस्कार 'यावर्षी ज्योती जोशी यांच्या ज्योतिष संस्थेला देण्यात आला.
सकाळी ११ ते ६ या वेळेत सर्व सामान्य नागरिकांसाठी निःशुल्क ज्योतिष सल्लाही देण्यात येणार आहे. या सल्ल्यासाठी विविध पध्दतीच्या १२ ज्योतिर्विदांची नियुक्ती केलेली आहे ,मात्र यासाठी नियोजित वेळ ठरविण्यासाठी आचार्या सौ.नीता वडके यांच्याशी 9923798686 या क्रमांकावर नावनोंदणी करावी.
Reviewed by ANN news network
on
८/२०/२०२३ ०१:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: