नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदार संघात महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर

 


पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड मतदार संघात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिराचे  आयोजन  मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मा.नगरसेवक  अतुल शितोळे माजी नगरसेवक पोपट जम , माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, सामाजिक कार्यकर्त्या  उज्वला सुनील ढोरे,  वैशाली पवार, माजी स्वीकृत सदस्य  सागर कोकणे,  शिवाजी पाडूळे,  शुभम वाल्हेकर, चंद्रकांत तापकीर,   सागर परदेशी,   पंकज कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते.


या महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मावळ विधानसभेचे आमदार  सुनिल   शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित  गव्हाणे,ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, 
माजी  महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक पंकज भालेकर,  मोरेश्वर भोंडवे,  प्रशांत शितोळे,  अतुल शितोळे, माजी  उपमहापौर  प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा  कविता आल्हाट, माजी नगरसेवक श्रीधर वाल्हेकर,  राजेंद्र साळुंखे, शीतल शिंदे,  निलेश बारणे,  शेखर चिंचवडे,  सचिन चिंचवडे,  राजेंद्र चिंचवडे,   प्रसाद शेट्टी, माउली सूर्यवंशी,  खंडूशेठ कोकणे,  माजी  नगरसेवक  राजेद्र जगताप, माजी नगरसेवक श्री. राजू लोखंडे,  उमेश काटे, श्याम  जगताप,  तानाजी जवळकर, विष्णु  शेळके,  सुनील ढोरे, गणेश काशीद,  अतुल काशीद,   गणेश फुगे,  विनोद धुमाळ,  सतिश स्वरंभे,  पवन साळुखे,  प्रसन्न डांगे, प्रशांत सपकाळ,  सचिन बारणे,  शरद बारणे,  गोरक्षनाथ पाषाणकर,  विशाल पवार,  विशाल बारणे,  अभिजीत आल्हाट,  चद्रकांत तापकीर,   मल्हारी  तापकीर,  शेखर काटे,   विवेक तापकीर,  काळुराम कवितेत,  सुमित डोळस,  सचिन काळे,  बाळासाहेब पिल्लेवार, माजी  नगरसेविका  शितल काटे,   चंदा लोखंडे,  सुषमा  तनपुरे ,  अश्विनी  तापकीर,  कविता  खराडे, सौ. शितल शितोळे,  संगीता कोकणे,  प्रियंका कोकणे,  तृप्ती  जवळकर,  इद्रायणी  देवकर, आदी  उपस्थित होते.तसेच या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून  नगरसेवक नाना काटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


नाना काटे यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यांचे औचित्य साधत आज दि. १३ ॲागस्ट रोजी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्‍यात आले होते . यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी शस्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . हे शिबिर नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय, वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन मंगल कार्यालय, रहाटणी येथील विमल गार्डन मंगल कार्यालय तसेच तापकीर नगर काळेवाडी येथे चंद्रकांत तापकीर यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात शुभम गार्डन वाल्हेकरवाडी येथे १०८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. १४६२ जणांची   आरोग्य तपासणी करण्यात आली. ६७ जणांचे मोतीबिंदूचे निदान करून शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.१७ जणांचे अस्थिरोग तपासणी करून निदान करण्यात आले. विमल गार्डन  रहाटणी येथे ७६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ११६४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ४८  जणांचे मोतीबिंदूचे निदान करून  शस्त्रक्रियेसाठी पाठविले. .११ जणांचे हाडांचे शस्त्रक्रिया करण्यासाठी  निदान करण्यात आले. चंद्रकांत तापकीर यांनी काळेवाडी  येथे आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात ३१२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्कृती लान्स नवी सांगवी येथील रक्तदान शिबिरात ५३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ६३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच थेरगाव येथील मनपा रूग्णालय येथे रूगणाना राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा वतीने फळे वाटप करण्यात आले तसेच नाना काटे व सागर कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रूगणावाहीकेचे लोकार्पण करण्यात आले, सर्व रक्तदान शिबिरामध्ये रक्दात्यानी उसफुर्त प्रतिसाद देत एकूण २६९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच या महाआरोग्य शिबिरासाठी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल,लोकमान्य हॉस्पिटल, संजीवनी ब्लड बँक, जनसेवा ब्लड बँक, रेड प्लस बॅक, या संस्थेंचे डॉक्टर आणि त्यांची टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.

नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदार संघात महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदार संघात महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर Reviewed by ANN news network on ८/१४/२०२३ १०:०६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".