होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे सीडी ११० डिलक्स लाँच

 



A picture containing logo, font, graphics, symbol

Description automatically generated



होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे २०२३ लाँच 

आरामदायी आणि टिकाऊपणाचा योग्य समतोल

 

अत्याधुनिक तंत्रज्ञान

-   ओबीडी२ नियमानुसार होंडाचे पीजीएम- एफआय इंजिन एनहान्स्ड स्मार्ट पॉवरसह (ईएसपी)

-   प्रत्येक वेळेस जलद, आवाजविरहीत आणि सहजपणे सुरू होणारी एसीजी स्टार्टर मोटर

-   सुरक्षित आणि काळजीमुक्त प्रवासासाठी इन- बिल्ट साइड स्टँड इंजिन इनहिबिटर

 

आरामदायी आणि सोयीस्कर

·         सोयीनुसार कमी वेगात आणि रात्रीच्या वेळेस प्रवास करताना भरपूर प्रकाश देणारे डीसी हेडलॅम्प्स

·         एकाच स्विचच्या मदतीने इंजिन सुरू/बंद करण्याची सोय

·         लांबलचक सीट (७२० एमएम) रायडर तसेच पिलियनसाठी आरामदायी

·         ब्रेकिंगच्या दमदार कामगिरीसाठी कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह

·         ४एएच एमएफ बॅटरी आणि व्हिसकॉस पेपर फिल्टरमुळे देखभालीची गरज कमी

 

आकर्षक स्टाइल

·         स्टायलिश ग्राफिक्स आणि आकर्षक व्हायसर आणि फेंडर

·         प्रभावी आणि उठावदार क्रोम मफलर कव्हर आणि फाइव्ह- स्पोक सिल्व्हर अलॉय व्हील्स

 

ग्राहकांसाठी आकर्षक मूल्य

·         १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी)

·         आकर्षक किंमत रू.७३,४०० (एक्स शोरूम दिल्ली)

 

नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज नवी सीडी ११० ड्रीम डिलक्स लाँच केली. होंडाची ही आधुनिक मोटरसायकल सर्वात किफायतशीर किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी वैशिष्ट्यं आणि आकर्षक स्टायलिंगच्या मदतीने ती प्राथमिक टप्प्यावरील मोटरसायकल श्रेणीची समीकरणे बदलण्यासाठी सज्ज आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ओबीडी२ नियमानुसार बनवण्यात आलेली सीडी ११० ड्रीम डिलक्स लाँच करताना आम्हाला आनंद होत असून वाजवी किंमत आणि दमदार कामगिरीमुळे ती भारतीय मोटरसायकल्सच्या बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल. ही आधुनिक मोटरसायकल आरामदायी, सोयीस्कर आणि टिकाऊ झाली असून त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पूर्ण मूल्य देण्याची होंडाची बांधिलकी नव्याने अधोरेखित झाली आहे.

एचएमएसआयच्या या नव्या उत्पादनाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथुर म्हणाले, सीडी ब्रँडचा वारसा पुढे नेण्यासाठी नवी सीडी ११० डिलक्स लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ही मोटरसायकल आरामदायीपणा, सोयीस्करपणा व स्टाइल यांचे सर्वसमावेशक पॅकेज आहे. आम्हाला खात्री आहे, की वाजवी किंमत आणि असामान्य मूल्य तसेच रोजच्या प्रवासासाठी अगदी योग्य असल्यामुळे ग्राहक वर्गाचा तिला भरभरून प्रतिसाद लाभेल.

 

आधुनिक तंत्रज्ञान

सीडी ११० ड्रीम डिलक्सच्या केंद्रस्थानी होंडाचे ओबीडी२ नियमानुसार तयार करण्यात आलेले पीजीएम- एफआय इंजिन होंडाच्याच नाविन्यपूर्ण एनहान्स्ड स्मार्ट पॉवरसह (ईएसपी) बसवण्यात आले आहे.

 

एससीजी स्टार्टरच्या मदतीने आवाजरहित स्टार्ट – ब्रशशिवाय बसवण्यात आलेल्या एसीजी स्टार्टर स्टार्टर गियरमध्ये नेहमीचा खरखरीत आवाज करत नाही आणि इंजिन झटक्याशिवाय सुरू होते, तसेच रायडिंग करताना बॅटरीही चार्ज करते. दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे कमी प्रयत्नांत इंजिन सुरू होते – यातले पहिले म्हणजे डीकंप्रेशनचा कार्यक्षम वापर आणि किंचित उघडलेले एक्झॉस्ट व्हॉल्व्हज (कंप्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला दिलेले) आणि त्यानंतर स्विंग बॅक सुविधा, ज्यामुळे इंजिन जरासे विरूद्ध दिशेला फिरते व त्यामुळे पिस्टनला रनिंग स्टार्ट मिळतो. पर्यायाने कमीत कमी उर्जेच्या वापराने इंजिन सुरू होते.

 

-   प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय)कार्यक्षमता आणि पर्यावरण जागरूकता हे या मोटरसायकलचे मुख्य आधारस्तंभ असून त्यामध्ये प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) इंटेलिजंट सेन्सर्ससह (इंजिन तेलाचे तापमान मोजणारे सेन्सर, इंजिनचा वेग मोजणारे सेन्सर, हवेचा दाब मोजणारे सेन्सर, हवेचे तापमान मोजणारे सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर) बसवण्यात आले असून त्यामुळे रायडिंगच्या परिस्थितीनुसार इंधन वितरण होते. पर्यायाने कंबशन प्रभावी होते, तर उत्सर्जन कमी होते.

 

 

·         कमी घर्षणऑफसेट सिलेंडर रॉकर रोलर आर्मचा नीडलसह वापर करत असल्यामुळे घर्षणातून होणारे नुकसान आणखी कमी होते व इंधन कार्यक्षमता वाढते. पिस्टन कूलिंग जेटमुळे तापमान कमी करण्याची क्षमता वाढते घर्षण कमी होते व इंजिनचे तापमान योग्य पातळीवर राखले जाते.

 

·         सोलेनॉइड व्हॉल्व्ह - ऑटोमॅटिक चोक यंत्रणेप्रमाणे काम करून रिच एयर फ्युएल मिक्श्चरची खात्री करते आणि अगदी कोणत्याही वेळी एकाच प्रयत्नात स्टार्ट होते.

 

·         सीडी ११० ड्रीम डिलक्समध्ये दर्जेदार ट्यूबलेस टायर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे पंक्चर झाल्यास लगेच हवा जात नाही.

 

इन- बिल्ट साइड स्टँड इनहिबिटर – यामुळे साइड स्टँडवर असताना इंजिन सुरू होत नाही व प्रवास आरामदायी तसेच काळजीमुक्त होतो.

 

आरामदायी आणि सोयीस्कर

सीडी ११० ड्रीम डिलक्समध्ये डीसी हेडलॅम्प वापरण्यात आले आहेत, जे एकसलग प्रकाश देतात आणि रात्रीच्या वेळेस ताणमुक्त प्रवास करता येतो.

दुहेरी इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच इंजिन सुरू करण्यासाठी खालच्या बाजूने, तर बंद करायचे असल्यास वरच्या बाजूस दाबता येतो.

 

सीडी ११० ड्रीम डिलक्सवरचा प्रत्येक प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर व्हावा यासाठी त्यात कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह देण्यात आला आहे. यामुळे पुढील आणि मागील टायर्समधे ब्रेकिंग क्षमतेचे विभाजन होते. यामध्ये सील चेन देण्यात आली आहे, ज्यासाठी कमी अडजस्टमेंट व देखभाल लागते. यामुळे रायडिंगचा एकंदर अनुभव उंचावतो.

 

लांबलचक आणि आरामदायी सीट (७२० एमएम) इंधनाच्या टाकीसह बसवण्यात आल्यामुळे रायडर तसेच पिलियनसाठी दूरचा प्रवास आरामदायी होतो. गाडीत ४एएच (एमएफ बॅटरी) बसवण्यात आली आहे, जी डीसी हेडलॅम्पसाठी पूरक आहे. व्हिसकॉस पेपर फिल्टरमुळे प्रत्येक सर्व्हिसिंगदरम्यान सखोल स्वच्छता करण्याची गरज पडत नाही. १८,००० किमी प्रवास झाल्यानंतर ती बदलता येऊ शकते.

 

आकर्षक स्टाइल

टँक आणि साइड कव्हरवरील स्टायलिश ग्राफिक्स, आकर्षक व्हायसर आणि फ्रंट फेंडर यामुळे सीडी ११० ड्रीम डिलक्सचे एकंद स्वरूप उठावदार झाले आहे. आकर्षक क्रोम मफलर कव्हर आणि फाइव्ह स्पोक सिल्व्हर अलॉय व्हील्समुळे मोटरसायकलच्या साइड प्रोफाइलच्या स्टायलिशपणात भर पडली आहे.

 

परिपूर्ण मूल्य

सीडी११० ड्रीम डिलक्स चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे – काळा व लाल, काळा व निळा, काळा व हिरवा आणि काळा व राखाडी यांचा त्यात समावेश आहे. गाडीची किंमत रू. ७३,४०० पासून (एक्स शोरूम दिल्ली) सुरू होते. एचएमएसआयतर्फे सीडी११० ड्रीम डिलक्सवर १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) देण्यात आले आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे सीडी ११० डिलक्स लाँच होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे सीडी ११० डिलक्स लाँच Reviewed by ANN news network on ८/१२/२०२३ १०:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".