पिंपरी : चिखली जाधववाडी परिसरात ३० जून रोजी तिघांनी गाडयांची तोडफोड करून लूटमार केली होती. या तिघांना ताब्यात घेण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट १ च्या पथकाला यश आले आहे. या त्रिकुटातील एक तरूण १९ वर्षांचा असून दोघे अल्पवयीन आहेत.
या तिघांनी ३० जून रोजी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून नागरिकांना कोयत्याने मारहाण करत लूटमार करून परीसरामध्ये दहशत निर्माण केली होती. त्याबाबत चिखली पोलीसठाण्यात ४१७ / २०२३ क्रमांकाने भादंवि कलम ३०७,३९२,३२३,५०६,४२७,३४ भा.ह.का.कलम ४(२५) क्रि.लॉ.अॅ. १९१३ चे कलम ३/७ मु.पो. कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये नोंद करण्यात आला होता.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हेशाखा समांतर तपास करत होती. तपास पथकाला गुन्हा करणारे तिघेजण चिखली, शिवरोड येथील जांभुळकर कॉर्नरला मोटरसायकल रस्त्याचे कडेला लावून थांबले असल्याचे माहिती मिळाली. पोलिसांनी तेथेव जाऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.ताब्यात घेतलेल्या तिघांनाही चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील अल्पवयीन मुलांनी चिखली, भोसरी एम. आय. डी. सी. पोलिसठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत.
ही कारवाई निरीक्षक संतोष पाटील, अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
७/०१/२०२३ ०९:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: