मुंबई : खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून मतभेद निर्माण झाले असून, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खात्यांचे वाटप लांबणीवर पडले आहे.
सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. बच्चू कडूंनीही असून त्यांनी आपण मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला असून, दहा दिवस उलटूनही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही. या मंत्र्यांचीही अस्वस्थता वाढली आहे.
अजित पवार अर्थमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे वृत्त आहे. तर शिंदे गटाचे नेते याला विरोध करत आहेत.
अजित पवार गटाची आज पुन्हा बैठक होणार आहे. काल अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. अजित पवार राहत असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. खाते वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. काल अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: