मीरा भाईंदर : भाईंदर, पूर्व, स्टेशनरोड येथे असलेअसलेल्या नवकिर्ती इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब सकाळी १०.३० ते ११.०० वाजण्याच्या कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत.
दुर्गा अवधेश राम (वय ४५ ) असे मृताचे नाव आहे, तो भाईंदर रेल्वे स्थानकावर बूटपॉलिश करण्याचे काम करीत असे. इंद्रजित शर्मा (48), जॉर्ज फर्नांडिस (55), हरिशंकर मौर्या (55), अबिद अली (22) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही इमारत मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत धोकादायक घोषित करून रिकामी करण्यात आली होती. ही इमारत इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. इमारत यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. मात्र, तळमजला येथे दुकाने सुरु होती. दुर्घटना घडताच पालिका आयुक्तांसह घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची 03 वाहने, 01 रेस्क्यू व्हॅन तसेच अग्निशमन जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे असे मिळून 54 अधिकारी व कर्मचारी पोहोचले. घटनास्थळी एका व्यक्तीच्या पायावर कॉंक्रीट स्लॅबचा भाग पडलेला असल्याने त्याला हलता येत नसल्याचे असे निदर्शनास आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॉंक्रीट कटरव इतर साहित्याच्या मदतीने सदर कॉंक्रीट स्लॅब तोडून त्यास बाहेर काढले.
त्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम करीत असताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखाली दुर्गा अवधेश राम याचा मृतदेह सापडला. ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण झाले असून इमारत तोडण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामध्ये एका रिक्षावर स्लॅब पडून रिक्षाचे नुकसान झाले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२०/२०२३ ०३:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: