नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदेगटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाबाबत आज १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना २ आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाकरेगटाचे सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या या याचिकेत नार्वेकर या प्रकरणी निर्णय घेण्यास विलंब लावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नार्वेकर यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
१६ आमदार निलंबन प्रकरणी विधानसभाध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागविले
Reviewed by ANN news network
on
७/१४/२०२३ ०२:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: