कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर

 


धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर नजिक असलेल्या पळसनेर येथे ब्रेक निकामी झालेला कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर ही घटना घडली. मध्यप्रदेशकडून येताना या मार्गावर तीव्र उतार असून त्या उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. आणि हा कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. हॉटेलमध्ये गर्दी  होती. त्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले. अपघाताच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कंटेनरने  काही वाहनांनाही  धडअक दिली आहे. अपघात घडताच आजूबाजूस असलेल्या नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना  रुग्णालयात हलविण्यात आले.

या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 


कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू ; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर Reviewed by ANN news network on ७/०४/२०२३ ०५:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".